पुढील सहा महिन्यांत बँकांच्या बुडीत कर्जामध्ये लक्षणीय वाढ होणार - रघुराम राजन

July 16,2020

नवी दिल्ली: १६जुलै - कोरोना संकटामुळे अनेक उद्योगांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. बर्याच जणांना कर्जाच्या हप्त्यांची परतफे ड करण्यात अडचणी येत आहेत. पुढील सहा महिन्यांत बँकांच्या बुडीत कर्जामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, अशी चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. ते आर्थिक संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या अधिवेशनात बोलत होते.

जनधन खात्याची जाहिरात झाली, त्याप्रमाणे काम झाले नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे एक सकारात्मक परिणाम म्हणजे कृषिक्षेत्र आहे. हे क्षेत्र खरोखर चांगले काम करत आहे. अर्थातच मोदी सरकारने सुधारणांना वाव दिला आहे. तत्पूर्वी या सुधारणांची बराच काळ केवळ चर्चाच होत होती. आता अंमलबजावणी झाल्याने अर्थव्यवस्थेचा तो मोठा भाग ठरणार आहे. आम्हाला खरोखरच समस्याची वास्तविक पातळी समजली, तर पुढील सहा महिन्यांत कर्जांची पातळी अनपेक्षित वरचढ होईल.

 डी. सुब्बाराव यांनी सांगितले की, यंदाचा खरीप हंगाम अनुकू ल असण्याची शक्यता असताना कृषी क्षेत्राच्या कामगिरीचा फायदा घेऊन सरकारने वाढीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा काहीशी चांगली कामगिरी करीत आहे. शहरी भाग अद्याप कोरोनाच्या संकटात आहे. एकू ण लोकसंख्येपैकी ग्रामीण अर्थव्यवस्था 65 टक्के आहे, तर त्यांचा सकल देशांतर्गत उत्पादनात 25 टक्के वाटा आहे. मनरेगाच्या विस्तारित खर्चामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था थोडी चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे.