वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराम यांचे आकस्मिक निधन

July 16,2020

जशपूर: १६ जुलै - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराम यांचे  बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षांचे होते.

 दुपारी जेवण घेतल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि यात ते बेेशुद्ध झाले. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी आश्रमात उपस्थित असलेले डॉ. प्रवीण आणि इतरांनी प्रयत्न केले. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे अथक प्रयत्न त्यांना वाचविण्यात अपयशी ठरले. दुपारी तीन वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 वनांचल क्षेत्रात आदिवासी मुलांना शिक्षित करून, त्यांच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांनी 1952 मध्ये वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली होती. जगदेव रामजी 1995 पासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते.