अमरावती शहरात ९४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

July 13,2020

अमरावती: १३जुलै - जिल्ह्यात आज सकाळी 31 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण अमरावती शहराला व्यापणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 945 वर पोहोचली आहे. लवकरच अमरावतीमधील रुग्ण संख्या एक हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

अमरावती शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपासून आज सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असताना एकूण 119 कोरोना रुग्ण अमरावतीत आढळले. सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात आणखी 31 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

आज प्राप्त अहवालानुसार वडाळी परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. वडाळी येथील भारत नगर परिसरात राहणाऱ्या आशा सेविकेला कोरोना झाला आहे. वडाळी येथील 30 वर्षाचा पुरुषही कोरोनाबधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडाळी येथे महिनाभरापूर्वी दोन कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, या भागत कोरोनाचा प्रसार झाला नाही. दोन रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आज सकाळी आलेल्या अहवालामधील कोरोनाबाधित रुग्णामंध्ये अतुल नगर परिसरातील 26 वर्षीय महिला, श्रीराम नगर येथील 27 वर्षीय पुरुष, एलआयसी कॉलनी येथे 49 वर्षीय पुरुष, वालगाव येथे 53 वर्षीय पुरुष, गडगेनागर परिसरात 25 वर्षीय युवक, संजय गांधी नगर येथे 21 वर्षीय युवक, सुकळी येथे 25 वर्षीय युवक, हनुमान नगर येथे 25 वर्षीय युवक, शेगाव नाका परिसरात 65 आणि 45 वर्षीय दोन पुरुष व 30 वर्षीय महिला,छत्रसाल नगर येथे 16 वर्षीय युवकाचा समावेश आहे.

गोपालनगर परिसरात गुरुकृपा कॉलनी येथे 39 वर्षीय पुरुष, सिद्धार्थ नगर येथे 46 वर्षीय पुरुष, वल्लभनगर येथे 20 वर्षीय युवक, आंबा कॉलनी येथे 55 वर्षीय पुरुष, सराफा बाजार परिसरात 30 वर्षीय पुरुष, मांगीलाल प्लॉट येथे 19 वर्षीय युवती, यशोदानगर येथे 40 वर्षीय पुरुष, बिच्चू टेकडी येथे 50 वर्षीय महिला आणि 49 वर्षीय पुरुष, मधवनागर परिसरात 44 वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी येथील माळीपुरा भागात 65 वर्षीय महिला, भातकुली तालुक्यातील वाकी रायपूर येथे 30 वर्षीय पुरुष आणि मोर्शी येथील 40 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.