नागपुरात कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू, बाधितांची संख्या १७४३

July 05,2020

नागपूर : ५ जुलै - नागपूर शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आज १७ नवे बाधित रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची संख्या १७४३ इतकी झाली आहे. तर आज शहरात एकाचा  मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या २६ इतकी झाली आहे. 

काल कोरोनाबाधितांची संख्या १७२७ होती आज १७ रुग्ण आढळले. तेलंगखेडी येथी ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, त्याला सरीच्या उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्याला श्वसनाचा त्रास जाणवत होता त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेयो हॉस्पिटल च्या प्रयोगशाळेत ३ रुग्ण, मेडिकल रुग्णालयातील प्रयोगशाळेत ३ रुग्ण, एम्स च्या प्रयोगशाळेत १ तर खासगी प्रयोगशाळेत ९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रोज नवनवीन परिसरात रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची दोखेदुखी वाढली आहे. 

आज अद्यापपावेतो बाधितांची संख्या १७४३, असून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १३६० इतकी आहे. तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या ३५७ इतकी आहे.