पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते नागपुरातील कलावंतांना शिधापत्रिका वाटप

July 05,2020

नागपूर :  दि ५ जुलै  - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या ताळेबंदीच्या परिस्थितीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब व गरजू नागरिकांना वेळोवेळी राशन किटचे वितरण करण्यात आले. आज गुरुपोर्णिमाचे औचित्य साधून नागपुर जिल्ह्यातील  शिधापत्रिका नसलेल्या ५० कलावंतांना पालकमंत्रांच्या हस्ते ऊर्जा अतिथिगृह, सदर नागपूर येथे शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

ताळेबंदीच्या काळात सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी मुश्किल ग्रुप नागपूरच्या कलावंतांना बेरोजगारीचा सामना करावा लागला.  अशावेळी कलावंतावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी पालकमंत्र्यांची  भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी काळाची गरज समजुन कलावंतांना राशन किटचे वाटप केले.

ज्या कलावंतांकडे शिधापत्रिका नव्हत्या त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला. ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी नागपूरचे संचालक मंडळ, विजय मधूमटके, धनराज राऊत, अशोक हरडे, लॉरेंस लुईस, किरण दीडसे यांनी परीश्रम घेतले.