नांदुऱ्यात ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

July 05,2020

 बुलडाणा : ५जुलै  -बुलढाणा  जिल्ह्यातील नांदुरा शहरातील गांधी चौकातील आशिष नवगजे यांच्या मालकीची ३ मजली इमारत आज शनिवारी ४ जुलैला सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान अचानक पत्यासारखी कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही इमारत ३४ वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदुरा शहरातील गांधी चौकात आशिष नावगोजे यांच्या मालकीची इमारत 34 वर्षीय इमारत  शनिवारी दुपारी एका दिशेला झुकलेली अवस्थेत झाली होती.  इमारतीच्या खालच्या बाजूस किराणा दुकान होते. तर वरच्या मजल्यावर नवगजे यांचे आई-वडील, पत्नी, मुलगी असे चार जणांचे कुटूंब याठिकाणी राहत होते. इमारत क्षतीग्रस्त होण्याच्या अगोदरच इमारत व परिसर रिकामे करण्यात आले होते. दुपारपासून इमारत जवळ कोणीही उपस्थित नव्हते. संध्याकाळी सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान अचानक पत्यासारखी कोसळली. इमारतीचा मलबा वस्तीत पडला आहे. घटनास्थळाची पाहणीसाठी तहसीलदार, ठाणेदारासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भेट दिली.