राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम फोडून मोठी रकम लंपास

July 05,2020

भंडारा : ५ जुलै - भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पटवारी भवन समोर असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरांनी फोडून ९ लाख ४१ हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली . 

शहरातील बहुतेक एटीएमवर सुरक्षारक्षक नाहीत. दि. ४ जुलैच्या रात्रीदरम्यान  चोरट्यांनी पटवारी भवन समोर असलेल्या महामार्गावरील भारतीय स्टेट बँकेचा एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून एटीएममध्ये असलेली ९ लाख ४१ हजार रुपये रोख लंपास केली. सदर प्रकार आज सकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे एटीएम परिसर हा मागील काही दिवसापासून प्रतिबंधित क्षेत्रात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात महामार्गावरील एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपये चोरून नेले, हि चिंतेची बाब आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळावर श्वानपथक व ठसे तज्ञ  यांना पाचारण करण्यात आले.