कोरोनाचा नागपूरच्या कारागृहात शिरकाव

June 30,2020

नागपूर : ३०जून - नागपूरला बसलेला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून आज पहिल्यांदाच नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आज ३१ असून एकूण बाधितांचा आकडा १५०३ वर गेला आहे.
गेल्या दोन दिवसापासून बाधितांची संख्या वाढतच जात असून कोरोनाने मध्यवर्ती कारागृहातही शिरकाव केला आहे. ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नागपूरसह ग्रामीण क्षेत्रातही कोरोना पोहोचल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.  काळ कोरोनाबाधितांची संख्या १४७२ होती ती आज १५०३ वर पोहोचली आहे.
१५०३ कोरोनाबाधितांपैकी ११९७ कोरोनमुक्त झाले आहे तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३०६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   सोमवार २९ जून रोजी आणखी २२ बाधित रुग्ण पुढे आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४७३ वर पोहोचली होती.