काँग्रेसचे आंदोलन बेगडी - देवेंद्र फडणवीस

June 29,2020

अमरावती : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने सुरु केलेले देशव्यापी आंदोलन बेगडी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे बोलतांना केली. आज अमरावतीतील भाजपच्या आंदोलनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.   पेट्रोल, डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल डिझेलवर टॅक्स लावल्यानेचं पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेत. त्यामुळे हे आंदोलन निरर्थक  आंदोलन आहे, असा टोला  देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आता नव्वदीपार झाल्या आहेत. त्याविरोधात अमरावतीत  काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी आहेत. पण, केंद्र सरकार सामान्यांना दिलासा देत नाहीय. कोविडमुळे आर्थिक मंदीचं सावट आहे. उद्योगधंद्यांची दयनीय अवस्था आहे. संपुर्ण अर्थकारण संकटात असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार महागाई वाढवतेय, अशी टीका काँग्रेस पक्षाने अमरावतीत केली. काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे.

 दरम्यान, कापूस खरेदी संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. विहित मुदतीत राज्य सरकार कापुस खरेदी करू शकले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर केंद्र सरकार कापूस खरेदी करायला तयार होतं. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला 5 हजार 700 कोटी रुपये दिलेत, असेही त्यांनी सांगितले. तर बोगस बियाणे संदर्भात दोषीवर कारवाई झाली पाहिजे, पण आज शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरपाई करुन देणार? त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, बोगस बियाणे संदर्भात कायद्याप्रमाणे कारवाई करावी तर शेतकऱ्यांचे यात रीतसर अर्ज घ्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यामुळं वाढत आहेत पेट्रोल-डिझेलचे दर

देशात कोरोनामुळं जवळपास अडीचे महिने लॉकडाऊन होता. यामुळं सरकारी तिजोरीवर चांगलाच भार आला. यानंतर सरकारकडे महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल हेच एकमेव चांगले सोर्स आहेत. जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळं खूप कमी झाली आहे. एप्रिल महिन्यात सेंट्रल जीएसटी कलेक्शन केवळ 6,000 कोटी रुपयांचं होतं तर एका वर्षापूर्वी या काळात सीजीएसटी कलेक्शन 47,000 कोटी इतकं होतं. यामुळं महसूलवाढीसाठी सरकार सतत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवत आहे. असा आरोप त्यांनी केला.