लाच घेताना सहायक दुय्यम निरीक्षक अटकेत

June 29,2020

नागपूर: २९जून - गोंदिया येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहायक दुय्यम निरीक्षक शैलेश तऱ्हाटे  व त्यांचा साथीदार याला ५ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज अटक केली. 

तक्रारदार  हा गोंदिया  येथील हॉटेलव्यवसायिक आहे त्याच्याविरुद्ध किरकोळ दारू विक्री करताना पकडले होते, तुमचा अवैध दारूचा व्यवसाय सुरु आहे तुमच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते कारवाई टाळण्याकरिता ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. या दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा   रचून शैलेश तऱ्हाटेला ५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली .