गडचिरोलीत हत्तीचा मृत्यू

June 29,2020

जि.गडचिरोली:२९जून -  गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात  कमलापूर  येथील हत्ती कॅम्पमधील एका चार वर्षांच्या आदित्य नावाच्या हत्तीचा आज पहाटे  मृत्यू झाल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून या हत्तीने खाणेपिणे सोडले होते. त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत होते त्यादरम्यान या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली असती तर आदित्य चे प्राण वाचू शकले असते अशी चर्चा गडचिरोलीत सुरु आहे. निसर्ग आपदेमुळे चिखलात रुतलेल्या चार वर्षाच्या हत्तीच्या मृत्युने वन्यजीव प्रेमी हळहळत आहेत