पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

June 29,2020

अकोला : २९जून - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. अकोल्यात काँग्रेस पक्षाचे मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवनच्या प्रांगणात जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन संपन्न झाले. धरणे आंदोलन संपल्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.

               या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष   एस.एन.खतीब, प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे, अकोला मनपाचे विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, विवेक पारसकर, प्रा. संजय बोडखे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वखारिया, बार्शिटाकळी नगर पंचायतचे अध्यक्ष महेफुज खान, बाळापुरचे नगराध्यक्ष एनोद्दीन खतीब, प्रकाश तायडे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, हेमंत देशमुख, अविनाश देशमुख, अशोक अमानकर, नगर सेवक मो. इरफान, पराग कांबळे, राजु नाईक, अकोला जिल्हा सोशल मिडियाचे अध्यक्ष भुषण टाले,  शार्दूल पाचपोर, भारत बोबडे, मो. युसुफ, अन्सार उल्ला खान, संतोष राऊत, सै. जहाँगीर, मो. इस्माईल टीवीवाले, मो. शोहेब मो.सिद्दिकी, धनराज राठोड, दिनेश खोब्रागडे, राजेश राऊत, कपिल रावदेव, राजेश मते पाटील, आकाश कवडे, अजय तायडे, संतोष राऊत, आकोश सायखेडे, प्रकाश वाकोडे, मो. ईस्माइल ठेकेदार, बाळासाहेब बाजड, दिनेश दुबे, डॉ. मो. रफिक लाखाणी, गजानन देहानकर, मनोज मिश्रा, सारंग मालाणी, मुकुंद पांडे, हरिश कटारिया, मो. शारीक, अमर कठारिया, नंदकिशोर काळे, गोपाल चोरे, रविंद्र बाळासाहेब तायडे, सागर कावरे पाटील, गणेश कळसकर, मो.सोहेल मो.सिद्दिकी, प्रकाश वाकोडे, जयराम वानखडे, मोईन खान मोन्टू, भुषण गायकवाड, अन्सार खान, आकाश सिरसाट, महेंद्र गवई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.