काश्मीर खोर्‍यात तीन अतिरेक्यांचा खातमा

June 27,2020

श्रीनगर, 27 जून - सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीर खोर्‍यात तीन अतिरेक्यांना चकमकीत ठार केले आहे. अन्य एक चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही शहीद झाला असून, एका अल्पवयीन मुलाचाही मृत्यू झाला आहे.

पुलवामा येथील एका भागात काही अतिरेकी आल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर सीआरपीएफ आणि पोलिसांनी मोहीम राबवली. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी ही चकमक झडली. ठार झालेले अतिरेकी कोणत्या गटाचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्याजवळून तीन एके रायफल आणि काही ग्रेनेड्स ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती लष्करी प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. या बागात आणखीही काही अतिरेकी असण्याची शक्यता असून, जवानांनी प्रातमधील अनेक परिसरांची नाकेबंदी केली आहे असे ते म्हणाले.