नागपुरात कोरोना रुग्णसंख्या १४०२, १०४४ रुग्णांची सुटी,२३ रुग्ण मृत

June 26,2020

नागपूर, 26 जून: जोवर कोरोनाची साखळी तुटणार नाही, तोवर बाधितांची संख्या वाढतच राहणार आहे. अनलॉकनंतर आता नागपूर शहरातील नवनवीन वसाहतीतून बाधित रुग्ण आढळून येत असल्याचे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. काल 51 बाधितांची नोंद झाली. आज त्यात नव्या १८ रुग्णांची भर पडल्याने शहरातील एकूण बाधितांची संख्या १४०२ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 1044 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान दोन  व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यू संख्या 2३ वर पोहोचली आहे.

शासनाने खासगी प्रयोगशाळेमधील तपासणीचे दर निम्म्यावर केल्यामुळे आता खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल होणारे खासगी प्रयोगशाळेतूनच कोरोना तपासणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळेतूनही दररोज बाधित रुग्ण पुढे येत आहेत. त्यासोबतच दरोरज नवनवीन वसाह7तीतून बाधित रुग्ण पुढे येत असल्याने आता जवळपास संपूर्ण शहरच कोरोनाच्या विळख्यात आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शहरातील विविध संस्थात्मक विलगीकरण केेंद्रात 1883 संशयित आहेत.

परंतु यापैकी बहुतांश जणांचे 
नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रथम नमुने घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा दुसरा नमुना सात दिवसांनी घेणइे अपेक्षित आहेत. त्यामुळेच शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी नमुनेच कमी आल्याचे सांगण्यात येते. शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये 190 वरच नमुने तपासण्यात आले आहेत.