चीनी दुतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला दिली होती देणगी; भाजपाचा आरोप

June 26,2020

नवी दिल्ली, 26 जून - चीनच्या दूतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी दिली होती, असा आरोप ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकरप्रसाद यांनी केला.

चीनच्या मुद्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरू आहे. यात भाजपाने काँग्रेसवर विशेषतः गांधी घराण्यावर जोरदार हल्ला चढवला. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत रविशंकरप्रसाद म्हणाले की,  राजीव गांधी फाऊंडेशनला चीनच्या दुतावासाने 90 लाख रुपये देणगी दिली होती. चीनला कांग्रेसचे एवढे प्रेम का आले, असा प्रश्‍न उपस्थित झाला. सरसकारच्या परवानगीशिवाय कोणताही राजकीय पक्ष विदेशातून देणगी घेऊज्ञ शकत  नाही. हे पैसे घेण्यासाठी काँग्रेसने सरकारची अनुमती घेतली होती का। याचे उत्तर काँग्रेसने देशाला दिले पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ काही कागदपत्रेही त्यांनी दाखवली.

राजीव गांधी फाऊंडेशनला 2005 आणि 2006 मध्ये देणग्या देणार्‍यांची यादी सापडली. यात चीनच्या दुतावासाने ही देणगी दिल्याचा उल्लेख आहे. याशिवाय अनेक उद्योगपती तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी या फाऊंडेशनला देणग्या दिल्याचा उल्लेख आहेत. या लोकांनी दिलेल्या देणग्या कमी पडल्या की काय म्हणून काँग्रेसला चीनच्या दूतावासाकडून देणगी घ्यावी लागली. असा टोला प्रसाद यांनी मारला. याच आशयाचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मध्यप्रदेश जनसंवाद रॅलीला संबोधित करताना केला होता.