काश्मीरातील चकमकीत 3 अतिरेकी ठार

June 04,2020

श्रीनगर, 4 जून - काश्मीरात पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. ठार झालेल्या अतिरेक्यांमध्ये अब्दुल रहमान उर्फ फौजी भाईचा  देखील समावेश आहे. तो जैशचा आयइडी तज्ज्ञ होता. उर्वरित दोन अतिरेकी स्थानिक आहेत. अफगाणिस्तानमध्ये युद्द लढण्याचा अनुभव अब्दुलला होता. पाकिस्तानी नागरिक असलेल्या अब्दुलच्या खातम्यामुळे सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. तो जैशसाठी आयईडी तज्ज्ञ म्हमून काम करायचा. असे सीआरपीएफचे महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले.

फौजी भाईचे खरे नाव हकम आहे. 1999 मध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपहरणात सहभागी जैशचा कमांडर अब्दुल रौफ असधरचा तो विश्‍वासू हस्तक होता. अशी माहिती सुरक्षा दलातील अधिकार्‍यांनी दिली. जैश-ए-मोहम्मदला काश्मीरमध्ये पुनरुज्जीवित करसण्यासाठी फौजी भाई आणि जैश-ए-मोहम्मदच्या भाडोत्री अइतरेक्यांनी काश्मीरात घुसखोरी केली होती, असेही या अधिकार्‍यांनी सांगितले.

घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांचा या गटाने जैशच्या स्थानिक अतिरेक्यांच्या मदतीने दक्षिण काश्मीरातील राजपुरा आणि ख्यू भागात तळ उभारला होता. आयईडीचा भीषण स्फोट घडवणे आणि एम-4 या स्निपर रायफलने सुरक्षा दलाच्या जवानांना टिपण्यात हा गट तज्ज्ञ होता.चेवा कलान, राजपुरा, रुपशी ताला, बडगामच्या ब3ादुरा भागात फौजी भाईच्या हालचाली होत्या.