खुल्या कारागृहातील कैद्याच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने घेतली दखल

June 04,2020

नागपूर, 4 जून - अमरावती जिल्ह्यात मोर्शी खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या प्रदीप गडेकर याच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, कारागृहात होत असलेल्या औषधी घोटाळ्याची  चौकशी करावी, अशी विनंती  रकणारे पत्र मोर्शी खुल्या कारागृहातील एकूण 42 कैद्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पाठवले आहे. या पत्राची दखल घेऊन रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्या. सुनील शुक्रे व न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. पत्राचे गांभिर्य लक्षात घेऊन खंडपीठाने मोर्शी खुल्या कारागृहाचे अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन सोनारे, जेल गार्ड मनोहर पटे व अंकुश त,.ेजनकर, पूर्व विभागाचे (कारागृह) पोलिस उपमहानिरीक्षक यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. प्रदीप गडेकर हा एका गंभीर गुन्ह्यात मोर्शी खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला जिभेचा अल्सर होता. यावर  उपचार करावा, अशी विनंती त्याने येथील मृत्यूला प्रशासन कारणीभूत प्रदीप गडेकर यांच्या मृत्यूूला मोर्शी मध्यवर्ती कारागृहातील प्रशासन व वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन सोनारे हे कारणीभूत असल्याचा आरोप येथील कैद्यांनी केला आहे.
त्यामुळे रमेश राठोड यांच्यासह 42 कैद्यांच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्र नागपूर खंडपीठाला पाठविण्यात आले आहे.