गडचिरोलीत पकडली 2 कोटी 20 लाखाची रोकड

June 04,2020

गडचिरोली, 4 जून - तेलंगणाच्या सीमेतून दोन वाहनांमधून महाराष्ट्राच्या सीमेत आलेली तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम सिरोंचा पोलिसांनी पकडली. ही कारवाई गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुलावर करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, स्कॉपिओ वाहनातून संजय जवथळे आणि चालक सुधीर राऊत हे मंथेरियल जिल्ह्यातील प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्राच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच्या पथकाने  वाहनाची तपासणी केली4 असता त्यात 1 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम आढळली. हे वाहन आसरअली भागातील तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे जात असल्याचे समजते.