आदित्याच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री

May 25,2020

मुंबई, 25 मे - मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबाबत चलबिचल सुरू होती. मात्र त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्यांना आव्हान स्वीकारण्याची गळ घातली. अशी माहिती आता समोर आली आहे. सुधीर सूर्यवंशी यांच्या पुस्तकात यासंबंधी उल्लेख प्रकाशित आहे.

चेकमेट होऊन बीजेपी वोन अ‍ॅण्ड लॉस्ट महाराष्ट्र हे पुस्तक सध्या चांगलेच गाजत आहे. पुस्तकात 11 नोव्हेंर 2019 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईच्या ताज लँडस अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये घडलेला पॅसंग सांगितलेला आहे. शिवसेना भाजपाची साथ सोडेल याची पक्की खात्री झाल्यानंतर शरद पवार यांनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी संजय राऊत, आदित्य ठाकरे, अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळेस पाटील उपस्थित  होते. सर्वानुमते शिवसेना, काँग्रेस, राकाँने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री कोण असेल याविषयी पवारांच्या मनात शंका होती.

याचवेळी राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई ही नावे चर्चेत होती. आदित्य मुख्यमंत्रिपदासाठी फारच लहान असल्याने अजित पवारांसह अन्य नेते त्यांच्या हाताखाली काम करायला राजी होणार नाहीत. देसाईंसह शिंदे यांना देखील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले जाणार नाही. असे मत झाल्याने उद्धव या नावावर ते ठाम होते. संजय राऊत तातडीने पुन्हा बैठकीच्या खोलीत गेले. त्याठिकाणी उद्धव आणि आदित्य बसले होते. शरद पवार युतीसाठी तयार आहेत. पण मुख्यमंत्री तुम्हीच व्हावे, असे पवारांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी सांगितले. इकडे आपण कधीही सरकारमध्ये काम केलेले नाही, असे सांगत उद्धव यासाठी तयार नवह्ते. शिवसेनाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत  असल्यास ही जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे नाहीतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. याचवेळी आदित्य म्हणाले की, बाबा, तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व केले पाहिजे. शिवसेनेच्या आणि  भविष्यासाठी हे करायलाच पाहिजे आणि यानंतर प्रचंड गतीने घडामोडी घडल्या, असेही नमूद आहे.