वर्धेत जिनिंग फॅक्टरीत आग

May 24,2020

वर्धा, 24 मे - वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील धानोली येथे गिरीराज जिनिंग फॅक्टरीला काल दुपारी अचानक आग लागली या आगीने अलपावधीतच रौद्ररुप धारण केले. या आगीत जिनिंगचे कोट्यवधींचे नुकसान झाले. या आगीने  जवळपासच्या सर्वच वस्तू व मशिन आपल्या विळख्यात घेतल्या. वर्ध्याहून अग्निशमन दलाचे बंबघटनास्थळी पोहोचले.

सेलूृ-सुकळी स्टेशन रस्त्यावरील गिरीराज जिनिंग प्रेसिंग येथील सीसीआयच्या खरेदी केलेल्या कापसाला जिनिंगमधीलि मोटारीमधून निघालेल्या आगीच्या ठिणगीने कापसाच्या गंजीला आग लागून जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करीत बाहेर असलेल्या जवळपास दोन हजार क्विंटल कापूस असलेल्या दोन्ही कापसाच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच जिनिंगचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिनिगंला आग लागल्याची बातमी पसरताच तत्परता दाखवित सेलू पोलिस स्टेशनचे सुनील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे, सचिव आय.आय. सुफी, युवा उद्योजक वरुण दप्तरी, कपिल  चांडक, महेश सिंगानिया यांच्यासह अनेक समाजसेवकांनी आगीवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रयत्न केले.