काश्मीरात पकडले तीन अतिरेकी

May 22,2020

श्रीनगर, 22 मे - दहशतवादविरोधी दिनाच्या दिवशी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे तीन अतिरेक्यांना पकडण्यात यश मिळवले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरुच आहे.  या दहशतवाद्यांकडून अनेक महत्त्वाचे खुलासे होतील असे म्हटले जात आहे. ही दहशतवादविरोधी मोहीम लश्कराच्या 28 आरआर कमांडने यशस्वी केली. कुपवाडा येथील सोगम परिसरातील वनक्षेत्रात दहशतवादी लपले असल्याची  माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर तत्काळ जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, या कारवाईत तिन्ही दहशतवादी पकडले गेले.

काही दिवसांपूर्वी या तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सुरक्षा दल सतर्क झाले होते.