सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना अनाहूत सल्ला

May 21,2020

नवी दिल्ली, 21मे - राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनाहुत सल्ला देऊन टाकला आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीतून बाहेर पडावे, असे  सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती शासन, हाच महाराष्ट्रासमोेर एकमेव मार्ग अशा शीर्षकाचा ऐक लेख सोशल मीडियावर सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केला आहे. सोबतच, माझ्या मते, आता किंवा कधीच नाही उद्धव ठाकरेंनी  आत्ताच युती तोडावी, अन्यथा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हळूहळू उद्धवस्त करून टाकेन, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

स्वामी यांच्या या ट्विटनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू होणार का? या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढलाय. उल्लेखनीय म्हणजे, नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावर विरोधी पक्षाने राज्यपालांकडे वारंवार तक्रारी करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे योग्य ठरेल. असे प्रत्युत्तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. दरम्यान, कोविड-19 चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने राज्य सरकारच्या आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडलीय. महाराष्ट्रात आजवर 37136 रुग्ण आढळले आहेत. यातील 22746 रुग्ण केवळ आर्थिक राजधानी मुंबईत आढळले आहेत. एकूण रुग्णापैकी
महाराष्ट्रात आतापर्यंत 1325 मृत्यू झालेत तर 9639 जणांनी कोरोनावर मात केली आहे.