वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'राईड टू सेफ्टी' रॅलीचे आयोजन
March 07,2025
• ५०० हून अधिक मुलांनी त्यांच्या पालकांसह घेतला सहभाग .
• आयएसआय मार्क असेलेल्या हेल्मेट चे वितरण
नागपूर : नागपूर शहरातील लकडगंज येथील अनाथ विद्यालय परिसरातील विनायकराव देशमुख हायस्कूल आणि सायन्स ज्युनियर कॉलेज मध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती उपक्रम म्हणून 'राइड टू सेफ्टी' रॅलीचे आयोजन आज करण्यात आले. या कार्यक्रमात, प्रमुख पाहुण्या म्हणून, नागपूरच्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती माधुरी बाविस्कर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या उपक्रमाचा उद्देश दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तिला रस्ता सुरक्षा नियमांबद्दल जागरूक करणे हा होता.
जवळपासच्या शाळांमधून आलेल्या त्यांच्या पालकांसह ५०० हून अधिक मुले रॅलीत सहभागी झाली होती. त्यांना आयएसआय चिन्हांकित हेल्मेट देण्यात आले आणि रस्ता सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन न करणे तसेच हेल्मेट न वापरणे अश्या धोक्यांबद्दल जागरूक करण्यात आले. आयसीआयसीआय लोम्बार्डने सीएसआर अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला आहे. कंपनीने आतापर्यंत ४.४७ लाखांहून अधिक आयएसआय चिन्हांकित हेल्मेट वितरित केले आहेत आणि या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतात १.५ लाखांहून अधिक हेल्मेट वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
