आद्य पत्रकार देवर्षी नारद सन्मान – 2024

June 28,2024

नागपूर : विश्व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पुरस्कार -2024 ची घोषणा करण्यात येत असून, यंदा विभिन्न सात श्रेणींमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बाजवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने खालील व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 11 हजार रुपये रोख असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. सिटिझन जर्नलिस्ट (नागरिक पत्रकारिता) श्रेणीत दोन पुरस्कार देण्यात येणार असून, त्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

पुरस्कार खालीलप्रमाणे – 

1) प्रिंट मीडिया – मंदार मोरोणे (महाराष्ट्र टाईम्स)

2) इलेक्ट्रॉनिक मीडिया – स्नेहल जोशी (सुदर्शन टीव्ही)

3) सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर – मनाली खंडेलवाल (MindYourLogic)

4) व्हिडीओ/फोटो जर्नलिस्ट – अनंत मुळे (तरुण भारत)

5) जागरण पत्रिका – मुलांचे मासिक (जयंत मोडक)

6) पोर्टल/वेबसाईट– द लाईव्ह नागपूर (संस्थापक संपादक –हिमांशू पंडीत

7) सीटिझन जर्नलिस्ट – अ) उमाशंकर श्रीनिवासन

                 ब) डॉ. हर्षवर्धन कांबळे


या पुरस्कारांचे वितरण शनिवार, 29 जून रोजी मिमोसा सभागृह, चिटणवीस सेंटर येथे संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित समारोहात केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्यूज-18 या वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ संपादक अमन चोपडा तर प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीपजी जोशी उपस्थित राहणार आहेत. 

पुरस्कार निवड समितीमध्ये सुधीर पाठक, विनोद देशमुख, मोईझ हक, आसावरी शेणोलीकर, कार्तिक लोखंडे, मंजूषा जोशी आणि डॉ. लखेश चंद्रवंशी यांचा समावेश होता. 


परिचय

1) मंदार मोरोणे – महाराष्ट्र टाईम्स, नागपूर येथे प्रिन्सिपल करस्पॉन्डण्ट. सांस्कृतिक, शिक्षण, वने आणि पर्यावरण या विषयांवरील वार्तांकन. पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर पदवी. 19 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. यापूर्वी सकाळ, द हितवाद, लोकसत्ता वृत्तपत्रात कामाचा अनुभव. विविध नियतकालिके, फेसबुक पेजेस, ब्लॉग्ज याकरिताही लेखन. 

2) स्नेहल जोशी –  सूदर्शन न्यूज, विदर्भ ब्युरो चिफ, शिक्षण- एम.ए. तत्त्वज्ञान, डीएड इन स्पेशल चाइल्डस सायकॉलॉजी, वृत्तपत्र विद्या व जन संज्ञापन पदविका. 17 वर्षांपासून पत्रकारिता. आकृती ॲड एजन्सी, लोकशाही वार्ता, तरुण भारतात कामाचा अनुभव. इव्हेंट, सर्क्युलेशन, जाहिरात विभाग, कमर्शियल रिपोर्टर असा वृत्तपत्रातील कामाचा अनुभव. इलेक्ट्रॉनिक माध्यमात पत्रकार म्हणून विदर्भ मीडिया, व्ही 24 तास, जी.टी.पी.एल. मध्ये कामाचा अनुभव.

3) मनाली खंडेलवाल, Mind Your Logic कंपनीच्या संचालिका. ही एक ॲनिमेशन आणि गेमिंग कंपनी असून, जिचे 12 दशलक्ष फॉलोअर्स आणि 3 अब्जाहून अधिक व्ह्यूज आहेत. youtube वर 13 दशलक्ष डाउनलोड आहेत. जगासाठी भारतातून शिक्षण आणि करमणुकीसाठी सुपर हिरो तयार करणे हे या कंपनीचे ध्येय आहे. कंपनीचा पहिला सुपर हिरो डिटेक्टिव्ह मेहुला 8 भाषांमध्ये 30  दशलक्षाहून अधिक मासिक ह्यूज मिळाले आहेत. 

4) अनंत मुळे –  वरिष्ठ छायाचित्रकार, तरुण भारत, 25 वर्षांपासून वृत्तछायाचित्रकार, फोटोग्राफी क्षेत्रात 35 वर्षे, म्यॅन्युअल प्रिंटिंगमध्ये विशेष प्रावीण्य, वाईड अँगल आणि एक्सपर्ट कॉमेंट हे लोकप्रिय स्तंभ. स्ट्रीट फोटग्राफी, पोलिटिकल कॅनडिड फोटोग्राफीची आवड. फोटोग्राफीच्या तंत्रज्ञानात वेगवेगळे प्रयोग करण्यात रुची. छायाचित्र क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे मानकरी.

5) जयंत मोडक, संपादक, मुलांचे मासिक, मुलांचे मासिकची स्थापना नोव्हेंबर 1927 मध्ये शिक्षक व स्वातंत्र्य सैनिक कै. बाळकृष्ण रामचंद्र मोडक यांनी केली. गेल्या 97 वर्षांपासून मासिक अखंडपणे प्रसिध्द होत आहे. महाराष्ट्रातील मुलामुलींच्या 5-6 पिढ्यांवर सुसंस्कार करण्याच्या कार्यात मासिकाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. आजही संपूर्ण महाराष्ट्रात मासिक आवडीने वाचले जाते. मराठीतील सर्वच श्रेष्ठ साहित्यिकांनी विशेषत्वाने वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर, वामन चोरघडे, चि. वि जोशी, रियासतकार सरदेसाई, पू. भा भावे, रमेश मंत्री, राम शेवाळकर, राजा बढे, भा. रा. भागवत आदींनी मुलांचे मासिकात नियमितपणे लिखाण केले आहे. मासिकाचे विविध विषयांवर विशेषांक निघत असतात (जसे विज्ञान, पर्यावरण, गणित, स्वातंत्र्य, वसुंधरा, आरोग्य, क्रीडा आदी.)

6) पोर्टल/वेबसाईट – नागपूर न्यूज (हिमांशू पंडीत- संस्थापक संपादक). डिसेंबर 2018 मध्ये लाँच करण्यात आलेले लाइव्ह नागपूर अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर गेले आहे. आज या वेब पोल्टलकडे 20,000 पेक्षा जास्त फेसबूक लाईक्स आहेत. या पोर्टलच्या अँड्रॉइड ॲप डाउनलोडचा आकडा 10,000 पेक्षा जास्त आहे. मासिक गुगल अनालिटिक्सच्या नोंदीनुसार 55 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स आणि 8 लाख वाचक आहेत. देशातील टॉप 100 इंग्रजी न्यूज वेबसाइटमध्ये दोनदा स्थान मिळाले आहे. राजकारण आणि गुन्हेगारी व्यतिरिक्त शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक समस्यांवर पोर्टल फोकस करते.

7) सीटिझन जर्नलिस्ट – अ) उमाशंकर श्रीनिवासन

ब) डॉ. हर्षवर्धन कांबळे.

पत्रकार परिषदेला चारुदत्त कहू, प्रमुख, विश्व संवाद केंद्र, विदर्भ, ब्रजेश मानस – नागपूर महानगर प्रचार प्रमुख यांची उपस्थिती होती.