उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट

October 03,2022

वर्धा, दि.2 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही बापूकुटीला भेट देऊन महात्मा गांधीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

 यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सूतमाळ देऊन  स्वागत करण्यात आले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत प्रार्थना करुन महात्मा गांधीच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले.