डॉ. राजेंद्र जयस्वाल हे , 100 कि.मी.“ हेन्नूर बांबू अल्ट्रा मॅरेथॉन-बँगलोर,ने सन्मानित

October 25,2021

अल्ट्रा धावपटू आणि अल्ट्रा सायकलपटू डॉ. राजेंद्र जयस्वाल यांनी  मार्च-२०२१ मध्ये “दुबई आयर्नमॅन” ७०.३  हा 'किताब पटकावला. ही  नागपूरकरांसाठी अत्यंत  अभिमानाची बाब होती.  लॉक डाऊन  पीरियडमध्ये  ड्रॉईंग  रूममध्ये 85 कि. मी.  नॉन स्टॉप धावण्याचा देखील त्यांनी विक्रम केला  आहे. 

काहीतरी वेगळे करण्याच्या अट्टाहास पोटी डॉ. राजेंद्र यांना  स्वस्थच बसू देत नव्हते. नुकतेच ९ ऑक्टोबर २०२१ रोजी, १०० कि. मी. “हेन्नूर बांबू  ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन –बँगलोर” मध्ये पदक जिंकले आहे.

ही  हेन्नूर बांबू ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन, बँगलोर येथे आयोजित करण्यात आली होती. ही एक जंगल ट्रेल असून यात जंगलातूनच धावत जावे लागते. खूप कठीण अशी ही ट्रेल असते. यामध्ये जंगलात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मग ती नैसर्गिक असू शकते किंवा अन्य. एकीकडे जंगली श्वापदांची भीती. या सर्वांवर मात करीत अखेर डॉ. राजेंद्र यांनी पदक जिंकलेच. 

राजेंद्र जैस्वाल यांच्या शब्दात ....९ ऑक्टोबर २०२१ रोजी हेन्नूर बांबू ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन, बँगलोर येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ३ पडाव होते. एक म्हणजे १००कि. मी, दुसरा म्हणजे १६१  कि.मी. आणि तिसरा म्हणजे २०० कि. मी. 

त्यादिवशी खूप मुसळधार पाऊस येत होता. हवामान खराब असल्यामुळे  जंगलातील पायवाटा ह्या चिखलमय तसेच निसरड्या झाल्या होत्या. सर्वत्र पाणी साचलेले होते. धड चालताही येत नव्हते, धावणे तर दूरच राहिले. खरं तर मला या परिस्थिती चा सामना कसा करावा याची अजिबातच कल्पना नव्हती. मला चालता येत नसल्यामुळे मी ४ वेळा घसरलो. माझ्या पायाची त्वचा फाटली आणि त्यामुळे बऱ्याच जखमा/फोड तयार झाले होते आणि वेदनादायक भेगा झाल्या होत्या आणि आजही या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत.  सरतेशेवटी १०० कि.मी हे अंतर मी २४ तासात पूर्ण केले. व त्यात पदक ही पटकाविले. 

मी १६१कि. मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण जखमांमध्ये/फोडा मध्ये   असह्य वेदना झाल्यामुळे १३५कि. मी वरच थांबावे लागले. १३५ कि. मी मी सुमारे ३२ तास धावलो हा माझा सर्वोत्तम प्रयत्न होता. हा प्रवास खडतर होता परंतु अमूल्य असे मार्गदर्शन मिळाल्याने मला इतका वेळ तग धरता आला. 

माझ्या यशाचे श्रेय हे माझे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक डॉ. अमित समर्थ यांना समर्पित करतो. वेळोवेळी  मला सहकार्य केले  अशी माझी  पत्नी विनीता, माझी मैत्रीण डॉ. सुनीता धोटे यांनी केलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. 

राजेंद्र जयस्वाल यांनी डिसेंबर 2019 मध्ये बहरीन आयर्नमॅन 70.3 मध्ये देखील पदक जिंकले होते.त्यांनी  12.5 तास हातात  तिरंगा पकडून  81 किमी  कि.मी. धावण्याचा नॉन स्टॉपचा विश्वविक्रम नोंदविलाआहे. लॉक डाऊन  पीरियडमध्ये  ड्रॉईंग  रूममध्ये 85 कि. मी.  नॉन स्टॉप धावण्याचा देखील त्यांचा विक्रम आहे.

त्यांनी  100 किमी आणि 161 किलोमीटरच्या ट्रायल रन  शर्यतीतही पदक जिंकले आहेत.