टोकियो ऑलिम्पिक - महिला स्पर्धकांनी वाढवल्या अपेक्षा

July 26,2021

टोकियो : २६ जुलै - टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला भारत्तोलक मीराबाई चानूने यशामुळे टोकियोतील इतर भारतीय  खेळाडूंना विशेषतः महिला खेळाडूंना स्फूरण चढले व त्यांनी भारतीय स्त्रीशक्तीचे शानदार प्रदर्शन करीत विजय  नोंदविला. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, बॉक्सर एमसी मेरी कोम आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्राने भारताला  आणखी पदक जिंकून देण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. लंडन ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेती मेरी कोमने टोकियोत रविवारी पहिल्या फेरीत हर्नांडिज गार्सियावर  मात करून पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. रिओ ऑलिम्पिकचे रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने  महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इस्त्रायलच्या केसनिया पॉलिकॉर्पोव्हावर विजय मिळविला. महिला टेबल  टेनिस एकेरीत मनिका बत्राने विजयी घोडदौड कायम राखीत तिसर्या फेरीत प्रवेश केला. मनिकाने ३२व्या  विश्वमानांकित युक्रेनच्या मार्गारिटा पेसोस्काला  पराभवाचा हादरा दिला. टोकियोत आज तांत्रिक  बिघाडामुळे युवा नेमबाज मनू भाकेर अंतिम फेरी गाठू शकली नाही.