रामकृष्ण मठाचे स्वामी मोक्षानंद महाराज निवर्तले

June 15,2021

नागपूर : १५ जून - नागपूरच्या धंतोलीस्थित रामकृष्ण मठाचे वरिष्ठ मार्गदर्शक श्रीमंत स्वामी मोक्षानंदजी महाराज (रामराव महाराज) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. भाविकांच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव रामकृष्ण मठाच्या औषधालयात ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीमंत स्वामी मोक्षानंदजी महाराज यांनी रामकृष्ण मठाच्या नागपूर केंद्रात विविध जबाबदार्या पार पाडल्या. शिस्तबद्ध आयुष्य जगणे म्हणजे काय? याचे उदाहरण त्यांनी शिष्यांपुढे ठेवले. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1940 रोजी झाला. 1 जानेवारी 1963 रोजी त्यांनी रामकृष्ण मठाच्या कार्याला प्रारंभ केला. प्रारंभी त्यांनी स्वामी यतिश्वरानंदजी महाराजांचे शिष्यत्व घेतले. श्रीमंत स्वामी विरेश्वरानंदजी महाराज यांच्याकडून त्यांनी ब‘ह्मचर्च दीक्षा आणि सन्यास दीक्षा घेतली. 1976 मध्ये त्यांनी सन्यास घेतला.