काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा - रामदास आठवले

June 15,2021

मुंबई : १५ जून - फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस च्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेस ने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल.  त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा  आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेस ला मुख्यमंत्री पद दिले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काढावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर  लढेल  तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची ईच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे.त्यामुळे काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार मध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काँग्रेस काढला  पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना केले आहे.