१ मे कामगार दिवस रोजी अत्यावश्यक सेवा व अन्य आस्थापना सुरु राहतील म.न.पा.चा खुलासा

May 01,2021

शनिवार दिनांक १ मे २०२१ रोजी कामगार दिवसानिमित्त सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील असे वृत्त काही प्रसार माध्यमा मार्फत प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तथापी अश्याप्रकारचे कुठलेही निर्देश नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेले नाही. कोव्हिड - १९ चा उद्रेक लक्षात घेता शासनाने यापूर्वी दिलेल्या दिशा निर्देशानुसार जाहीर केलेले निर्बंध कायम असून अत्यावश्यक सेवेतील औषधी दुकाने व अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने यापूर्वी म.न.पा.व्दारे निर्धारित वेळेनुसार सुरु राहतील. तरी याबाबतचे अफवांवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा म.न.पा. व्दारे करण्यात येत आहे.