रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 3 आरोपींना जरीपटका पोलीसांनी केली अटक

April 17,2021

नागपूर, दि. १७ : सर्वत्र आक्सीजन व रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा असतानाच काहीजन याचा गैरफायदा घेवून काळाबाजारी करतांना आढळून येत आहेत. अशीच एक घटना नागपूरात घडली आहे.

रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजारी करणा-या 3 आरोपींना जरीपटका पोलीसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. आरोपींवर विविध कलमांनुसार आज शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर असे कि, नागपूरचे पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार यांना गुप्त माहिती मिळाली की, जरीपटका हद्दीत रेमडीसिविर इंजेक्शन विक्रीचा काळाबाजार होत आहे.  त्या अनुषंगाने परिमंडळ क्र.5 चे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली  जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री नितीन फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकाते व स्टाफने सापळा रचून 3 आरोपींना रेमडीसिवीर इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकून काळाबाजार करताना मार्टीन नगर येथून रंगेहात अटक केली आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास उर्फ विवेक लक्ष्मणराव ढोकणे पाटील वय 34 वर्ष, धंदा फार्मा डिस्ट्रीब्यूटर व क्राईम रिपोर्टर (महाराष्ट्र न्यूज 7) रा. प्लॉट न 1, आरचरे क्राऊन, मनिष नगर नागपूर, अमन जितेंद्र शिंदे वय 21 वर्ष रा मॉडेल मिल चौक, नागपूर आणि ईश्वर उर्फ बिट्टू मुकेश मंडल वय 28 वर्ष रा. मार्टिन नगर  नागपूर अशी आहेत.

आरोपींचे ताब्यातुन पोलीसांनी तीन वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण चार रेमडीसिविर इंजेक्शन, रोख रक्कम 13,000/- रुपये, एक चार चाकी वाहन, एक मनगटी घड्याळ, चार मोबाईल फोन आणि एक मोपेड गाडी असा एकूण 6,55,500/-  रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर कलम 420,188, 34 भादवि. सह परिशिष्ट 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013, सहा कलम 37 अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 18, 27 2 व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 व नियम 1954 कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना 2 दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे.