कोरोनाचा हाहाकार आज ५५१४ नवे बाधित तर ७३ रुग्णांचा मृत्यू

April 08,2021

नागपूर : ८ एप्रिल - पूर्व विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे कडक निर्बंध लावूनही रुग्णसंख्या कमी न होता रोज  नवे विक्रम प्रस्थापित करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून रुग्णसंख्या हजाराच्या वरच आहे. नागपूर शहरात कोरोनामुळे मृत्यूचे अक्षरशः तांडव सुरु  आहे. आज पूर्व विदर्भात ८४३९ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून त्यात नागपूरचे ५५१४ रुग्ण आहेत तर पूर्व विदर्भात ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नागपूरचे ७३ रुग्णांची नोंद आहे. 

कालच नागपुरात रुग्णसंख्या व मृत्युसंख्येचा विक्रम नोंदविण्यात आला होता पण एकाच दिवसात हा विक्रम मोडीत निघाला असून आज नागपुरात तब्बल  ५५१४ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत त्यात ग्रामीण भागातील २६२८ तर शहरातील २८८१ रुग्ण तर इतर जिल्ह्यातील ५ रुग्ण  आहेत.  ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यात ग्रामीण २५ शहरातील ४० तर इतर जिल्ह्यातील ५ रुग्णांचा समावेश आहे.    नागपुरातील एकूण बाधितांची संख्या आता २५८६६० वर पोहोचली आहे तर एकूण मृत्युसंख्या ५५७६ वर पोहोचली आहे.  शहरात आज १९१७६ चाचण्या घेण्यात आल्या त्यात ९५८१ ग्रामीण भागात तर ९५९५ शहरी भागात चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या २४ तासात ३२७७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २०८८७९ वर पोहोंचली आहे. तर कोरोनमुक्तीचे प्रमाण ८०. ४९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या नागपुरात ४५०९७ ऍक्टिव्ह बाधित रुग्ण असून त्यात १५३७६ ग्रामीण भागात तर २९७२१ शहरातील रुग्ण आहेत.