कोरोनामुळे मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत -संभाजी भिडे खळबळ विधान

April 08,2021

सांगली : ८९ एप्रिल -करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी करोना निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

“मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही”.

पुढे ते म्हणाले की, “मी काही राजकीय माणूस नाही. पण माझ्यासारखी असंख्य लोक संपूर्ण देशात अस्वस्थ आहेत. हा मूर्खपणा सुरु आहे. करोना हा रोगच नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे”.