जे सत्य आहे ते पुढे आले पाहिजे - देवेंद्र फडणवीस

April 08,2021

नागपूर: ८ एप्रिल - महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात वाझेचे कथित पत्र हे व्हायरल झाले आहे. हे पत्र सर्वांना विचार करायला भाग पडणारे असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणणे आहे. या पत्रातील मजकूर महाराष्ट्र व पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगला नाही. जे सत्य आहे ते पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. ते नागपूर विमानतळात माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टीना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले", असा खळबळजनक आरोप सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे. या पत्रावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असून विरोधकांनीही सरकाराला लक्ष्य केलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी जे जबाब नोंदवले जात असतील त्याची नीट चौकशी झाली पाहिजे. व सत्य योग्य प्रकारे बाहेर आलं पाहिजे. कारण सरकारची प्रतिमा डागाळत आहे, असं म्हटलं आहे.

'सरकारने रेमडेसिवीरच्या संदर्भात विषेश लक्ष देण्याची गरज आहे. रेडमेसिवीरचा काळाबाजार काही जण करत आहेत. करोनाची दुसरी लाट देशातील काही राज्यात आहे. त्यामुळं आपल्या राज्यांनं ज्या राज्यात करोनाची लाट नाही त्या राज्यातून रेमडेसिवीर घ्यायला हवं. काळबाजार करणाऱ्यावर सरकारने कारवाई करण्याची गरज आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.