बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

April 08,2021

वाशीम ८ एप्रिल : मंगरूळनाथ  तालुक्यातील चिखलागड येथे  सकाळी 8 च्या सुमारास येथील चरणदास भिमराम इंगोले या युवकावर बिबट्याने अचानकपणे हल्ला केल्याने या हल्ल्यात सदर युवक जखमी झाला असून, उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंगरुळनाथ येथे दाखल करण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  सकाळी 7. 30 ते 8 च्या सुमारास तालुक्यातील चिखलागड येथील युवक चरणदास इंगोले (वय 36) हे आपल्या गट नंबर-191 च्या शेतात गेले असता अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यात पाय आणि पोटावर गंभीर जखमा केल्या.

 त्यावेळी चरणदास इंगोले चा भाऊ धावत येऊन आरडाओरड केल्याने बिबट्या तिथुन पसार झाला. घटनेची माहीती तात्काळ आसेगाव व मंगरुळनाथ पोस्टे ला देवुनवनविभागालाही कळविण्यात आले. याबाबत वनविभाग व पोलिस अधिकार्यांनी जखमीची भेट घेवून बयाण नोंदविले व घटनेचा पंचनामा केला. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना तसेच तलाठ्यांनीही पंचनामा करुन अहवाल तहसीलदार यांना पाठवण्यात आला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, याआधीही असे हल्ले परिसरात झाल्याने या बिबट्याला जेरबंद करण्याचे आव्हान आता वनविभागापुढे उभे राहले आहे.