वर्धेत गिमाटेक्स इंडस्ट्रीला आग, ९० लाखांचे नुकसान

April 07,2021

वर्धा : ७ एप्रिल - गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड वणी येथील कापड विभागात आज ७ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत ९० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिमा टेक्समधील कापड विभागातून कामगारांना आगीचे लोळ निघताना दिसताच कामगारांनी उपलब्ध असलेल्या हायड्रेन व अग्निशामक उपकरणाचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्याबाहेर असल्याने व्यवस्थापनाने अग्निशामक दल हिंगणघाट व अग्निशामक दल देवळी याना पाचारण करण्यात आले. 

हिंगणघाट पोलीस स्टेशन यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशामक दल हिंगणघाट व पोलिस घटनास्थळी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले अथक परिश्रमा नंतर अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग ट्यूबलाइटच्या ठिणगी उडाल्याने लागली असे प्राथमिक अंदाजात व्यवस्थापना मार्फत सांगण्यात आले. आगीत कंपनीची मशिनरी सुत कच्चा माल, इलेक्ट्रिक केबल, सायझिंग मशीन पार्ट व उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती चाकंस्थापनाने  दिली.