निवासी डॉक्टर आजपासून संपावर

April 07,2021

नागपूर : ७ एप्रिल - नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकल आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेयो येथील निवासी डॉक्टर आजपासून  संपावर गेले आहेत.  

या संपासंदर्भात निवासी डॉक्टर असोसिएशन सेंट्रल मार्डने डीएमईआर मुंबईच्या संचालकांना पत्र दिले आहे. येथील निवासी डॉक्टरांनी सांगितले की, तीन वर्षांच्या शिक्षणक्रमापैकी दीड वर्ष कोविड पेशंटच्या सेवेत निघून गेले आहे. यामुळे शिक्षण प्रभावित होत आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकार कोविड रुग्णांच्या सेवेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यास असर्मथ ठरले आहे. कोविड रुग्णांसाठी दुसरी व्यवस्था करावी तसेच निवासी डॉक्टरांना दूर ठेवावे., अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता संपावर जाण्याची सूचना दिली. यादरम्यान ओपीडी आणि नॉन कोविड सेवादेखील बंद करण्याची सूचना दिली आहे. सेंट्रल मॉर्डचे डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे, डॉ. नीलेश कल्याणकर, डॉ. प्रणव जाधव, डॉ. साकेत मुंधडा,डॉ. शुभम कट्टी, डॉ. आबासाहेब तिड.के, डॉ. अक्षय चावरे, डॉ. अजित माने, डॉ. स्वप्निल कजाळे, डॉ. अर्पित धकाते, डॉ. प्रसन्ना नेने, डॉ. अरुण गुल्हे आदींनी ही माहिती दिली.