चार हजाराची लाच स्वीकारतांना अभिलेखापालास अटक

April 07,2021

यवतमाळ : ७ एप्रिल - महागाव तालुक्यातील काळी दौ येथील शेताकडे जाणार्या पांदण रस्त्याचे मोजमाप करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल व्ही .एन. हेमके यांनी चार हजाराची मागणी करण्यात केली. त्यापैकी दोन हजार रुपए आधी घेतले होते. तर दोन हजार स्वीकारतांना काल  सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटां दरम्यान तहसील कार्यालय समोर एका हॉटेलमध्ये घेताना रंगेहात पकडले. या घटनमुळे भूमिअभिलेख कार्यालय हादरून गेले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, काळी दौ येथील शेतकरी फुलसिंग राठोड यांनी पांदन रस्त्याच्या मोजमाप पुन्हा करण्यासाठी अभिलेखापाल व्ही एन हेमके यांनी चार हजारांची मागणी केली होती .दोन हजार या आधी दिले होते .तर दोन हजार रुपये आज तहसील कार्यालयासमोरील एका चहाटपरीवर घेताना यवतमाळ येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, पो कॉ सचिन भोयर,महेश वाकोडे, अब्दुल वसीम, राकेश सावसाकळे,व वाहान चालक संजय कांबळे यांनी ही कार्यवाही पारपाडली आहे.