न्या. अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर यांच्यासह १० न्यायाधीशांना कायमस्वरूपी नियुक्ती

April 07,2021

नागपूर : ७ एप्रिल - मुंबई उच्च न्यायालयातील न्या. अविनाश घरोटे, न्या. नितीन सूर्यवंशी, न्या. अनिल किलोर यांच्यासह दहा न्यायाधीशांच्या कायमस्वरुपी नियुक्तीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने  हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

यात इतर दहा न्यायालयाधीशांमध्ये न्या. मिलिंद जाधव, न्या. एम. जी. सेवलीकर, न्या. व्ही. जी. बिश्त, न्या. भालचंद्र देबडवार, न्या. एम. एस. जावळकर, न्या. एस. पी. तावडे व न्या. एन. आर बोरकर यांचा समावेश आहे. हे सर्व मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांना आता कायमस्वरुपी नियुक्ती प्रदान करण्यात आली आहे. सध्या न्या. घरोटे व न्या. सूर्यवंशी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत आहेत.