अवनीचा छावा जखमी त्वरित उपचार सुरु

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - पेंच प्रकल्पाच्या जंगलात अवनीच्या छाव्याला ५ मार्चला पिंजऱ्यातून मुक्त करून निसर्गाच्या सानिध्यात सोडले होते. आज तो छावा वनाधिकाऱ्यांनी जखमी अवस्थेत आढळून आला त्याच्यावर आज ट्रांकुलाईज करून उपचार करण्यात आले. 

अवनीच्या छाव्याला नैसर्गिक वातावरणात पाठविण्यासाठी वनविभागाने निर्णय घेतला ५ मार्चला त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढून पेंच अभयारण्याच्या टायगर रिझर्व्ह मध्ये सोडण्यात आले आज सकाळी तो जखमी अवस्थेत आढळून आला या छाव्यावर वनविभागाची नजर होती तसेच त्याच्या मानेवर लावलेल्या सॅटेलाईट बेल्टमुळे हे लक्षात आले.  शेवटी त्याला ट्रांकुलाईज करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. छाव्यावर   उपचार  डॉ. चेतन पातोंड व डॉ. सय्यद बिलाल यांनी केले .