महाराष्ट्र राज्याचे बजेट सर्वांच्या कल्याणाचे : कृपाल तुमाने

March 08,2021

नागपूर. दि. ८ मार्च  : महाराष्ट्र राज्याचे बजेट हे शेतकरी व गरिबाचे कल्याण साधणारे असून सर्वसमावेशक व उत्तम असा अर्थसंकल्प  राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात वित्त मंत्री  अजित पवार यांनी सादर केला  आहे.  असे मत रामटेकचे शिवसेना खासदार  कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज राज्याच्या विधिमंडळात पारित झाला. त्यावर खासदार  कृपाल तुमाने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली,  खासदार कृपाल तुमाने म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या बजेट मध्ये आरोग्य यंत्रणा सबल कण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन रुग्णालये व नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दरावर पीक कर्ज मिळेल व बाजार समितीच्या बळकटीकरण, थकीत वीजबिलावर सूट, शेतमाल बाजारपेठ, व मूल्यसाखळी, भाजीपाला रोपवाटिका, पशुपालाकांसाठी योजना आखण्यात आल्याने ग्रामीण जनतेला मोठा फायदा होणार आहे. राज्यात रस्ते विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. पर्यायी इंधन म्हणून सीएनजी व विद्युत बसेस चाल्विण्याची राज्य सरकारची योजना उत्तम आहे. शिक्षण व इतर विकासासाठी मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे  यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प उत्तम व सर्वसमावेशक आहे, यामुळे हे बजेट सर्वांच्या कल्याणाचे आहे, असेही खासदार कृपाल तुमाने म्हणाले.