नागपुरात ९ प्रतिष्ठानांवर कारवाई

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. ८ मार्च) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६३,००० चा दंड वसूल केला.त्रिमुर्तीनगर येथे घरी होणा-या लग्न समारंभात सामाजिक अंतर न पाळण्यासाठी रु ५००० चे दंड वसूल केले. पथकानी ९५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.