राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर

March 08,2021

मुंबई : ८ मार्च - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प  सादर केला. राज्य सरकारने या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. कोरोना संकटाला लक्षात ठेवून राज्याच्या आरोग्य विभागासाठी 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

अजित पवार यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनातील संपूर्ण भाषण

“कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम श्रेणीवर्धन करुन जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला असून येत्या चार वर्षात तो प्रकल्पपूर्ण करण्यात येईल. या प्रस्तावात जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्राचे बांधकाम तसेच तालुका स्तरावरील रुग्णालयांचे श्रेणीवर्धन आणि बांधकाम यांचा समावेश आहे.  त्याचबरोबर पोस्ट कोव्हिड उपचारासाठी प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये समुपदेशन विभाग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंदापूर, बारामती तालुक्यात कोटींची सिंचन योजना

केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे 100 हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांसाठी 24 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर, बारामती तालुक्यातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने कोटींची सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

जलसंपदा विभागात 12951 कोटी रुपयांचा निधी

जलसंपदा विभागात 12951 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. राज्यातील 681 चर्चमध्ये परीक्षा नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत करण्यात येत आहे. 916 कामांची दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावरन 1 हजार 340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम जलसंधारण विभागात 3 हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे.

अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीच्या व कल्याणकारी योजनांच्या बरोबरच पायाभूत सुविधा

2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भ, विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना 5 हजार 1224 कोटी रुपये एवढी मदत करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती मदत व इतर खर्चासाठी अकरा हजार तीनशे 15 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. 2020 मध्ये राज्याच्या उत्पन्नात आठ टक्के घट झाली. या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीच्या व कल्याणकारी योजनांच्या बरोबरच पायाभूत सुविधा देण्यावर देखील भर आला आहे.

समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराज महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झालं आहे. 720 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला करण्यात येणार आहे. त्या मार्गाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्याच्या विकासासाठी ‘स्टार प्रवाह’ या उद्देशाने नांदेड ते जालना मार्गाचे सात हजार कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात येत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडे दहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या तसेच दोन किलोमीटर लांबीच्या दोन पूलांचा समावेश असलेल्या 595 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग असेल अशी आशा आहे.

राज्यातून तसेच राज्यातील कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक पुणे शहरात आहे. शहरातील वाहतुकीवरील त्याचा प्रचंड ताण पडतो. त्यामुळे पुण्यावरून चक्राकार मार्गाची उभारणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. या मार्गामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येवर मात करता येईल.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्याचीदेखील अंमलबजावणी सुरु आहे. मुंबई शहरातील वाहतूक सुविधा जागतिक दर्जाचे असावेत. त्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये शिवडी न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा नियोजनही आहे. मुंब्रा बायपास, मुंब्रा जंक्शन, कल्याण फाटा, कल्याण फाटा पुलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा मंडपाचे काम प्रगतीपथावर आहे.

‘महाविकास आघाडी सरकारचं संत तुकाराम महाराजांचा सिद्धांत डोळ्यात ठेवून काम सुरु’

“हा महाराष्ट्र आहे, हा कधी संकटापुढे झुकला नाही. संकटामुळे मागे हटला नाही. इतिहासाची पाने चाळली तर अर्थकारण कमी असताना स्वराज्य उभा करत याच महाराष्ट्रात सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान झाला. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. ते केवळ मराठी मुलखातील 18 पगड जाती-जमातीच्या एकतेतून आजही कोरोनाच्या महाभयंकर संकटासमोर उभा देश आहे. अर्थकारण हा सरकारपुढे मोठा प्रश्न आणि आव्हान आहे. हे आव्हान पेलताना आमचं महाविकास आघाडीचं सरकार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा सिद्धांत डोळ्यात ठेवून काम करत आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“२०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मी कोव्हिड आजाराचे गांभीर्य विषद केले होते. या विषाणूच्या प्रसाराला भारतात त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती. पण 15 दिवसात देशात टाळेबंदी करावी लागली. कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा, त्यानंतर वर्षभर आपण अनुभव घेतला. आजही आपण लढतो आहोत. या लढाईत सामील झालेल्या कोरोना योद्ध्यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो. आजारात बळी पडलेल्या राज्यातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. महिला पोलीस कर्मचारी, आशा वर्कर आणि सर्व महिला कोव्हिड वॉरीअरचा आदरपूर्वक उल्लेख करतो”, असं अजित पवार म्हणाले.