अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचा तपास आता एनआयए करणार

March 08,2021

मुंबई : ८ मार्च - मुंबईत काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात  मोठी घडामोड घडताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे  सोपवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

एएनआयने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. याप्रकरणी आधीच एटीएस  कडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसुख हिरने यांची पत्नी आणि मोठ्या मुलाने एटीसच्या कार्यालयात दाखल होत हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

25 फेब्रुवारी रोजी मुंबईत विस्फोटांनी भरलेली गाडी सापडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने NIA कडे मागणी केली होती. मुंबईतील कार्मिकल रोड येथे उभ्या केलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर या मागील नेमकं कोण आहे याचा तपासही सुरू झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खुण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे.