दिल्लीतील मॅरेथॉन मध्ये नागपूरच्या महिला धावपटूंची नेत्रदीपक कामगिरी

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - नवी दिल्ली येथे रविवारी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत नागपूरच्या महिला धावपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत नागपूरकरांना जागतिक महिला दिनाची एक अविस्मरणीय भेट दिली आहे. एजीस फेडरल लाइफ इन्शुरन्स आणि भारतीय अँथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित स्पर्धेत धावपटू ज्योती चौहानने सुवर्ण तर प्राची गोडबोलेने रौप्यपदक प्राप्त केले. 

स्पर्धेत महिलांची २१ किलोमीटर अंतराची अर्थमॅरेथॉन स्पर्धा प्रतिभावंत धावपटू ज्योती चौहानने १ तास २० मिनिटे ५७ सेकंदात पूर्ण करीत अव्वल स्थानासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर ज्योतीला १० हजार रुपयाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महिलांच्या ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत प्राची गोडबोलेने नेत्रदीपक कामगिरी करीत सर्वांना आश्चर्यचकित केले. ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स क्लबची सदस्य असलेल्या प्राचीने पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा ३ तास ३ मिनिटे ४४ सेकंदात पूर्ण करीत ती द्वितीय स्थानी राहिली. प्रशिक्षक रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करणाèया प्राचीला २० हजार रुपयांचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन इलाइट गटात ब्लॅक बर्ड फ्लायर्सची खेळाडू स्वाती पंचबुधेनेही उल्लेखनिय कामगिरी केली. स्वातीने ही स्पर्धा ३ तास ८ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करीत पाचव्या स्थानी राहिली. तिलाही २० हजार रुपयांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक कमलेश qहगे यांच्या मार्गदर्शना स्वाती सराव करते. 

महिला दिनाच्या पूर्वदिनी झालेल्या नवी दिल्ली मॅराथॉनमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत नागपूर शहराचे नाव उज्ज्वल करणाèया धावपटूंचे नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, अध्यक्ष गुरुदेव नगराळे, नगरसेवक नागेश सहारे, मनपा क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांच्यासह एस.जे. अॅन्थोनी, उमेश नायडू, डॉ. संजय चौधरी, डॉ. आदित्य सोनी, शेखर सूर्यवंशी, रामचंद्र वाणी, विवेकानंद qसग, अर्चना कोट्टेवार, जितेंद्र घोरदडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.