विवाहित महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - माहेरी आलेल्या विवाहित महिलेवर शेजारी राहणार्या प्रियकराने तिला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेचे ४ वर्षाआधी लग्न झाले. तिच्या शेजारी राहणार्या आरोपी नीलेश रामुजी गजबे (२८) याच्याशी विवाहितेचीच शेजारी असल्याने मैत्री होती. लग्नानंतर पीडिता पहिल्यांदा १0 मे २0१८ ला माहेरी आली. त्यावेळी मैत्रीचा फायदा घेऊन आरोपी नीलेशने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. ती माहेरी आली की तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा. ८ फेब्रवारीपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. मग त्यांच्यात बिनसले. त्यानंतर महिलेने कोराडी पोलिस ठाण्यात जाऊन प्रियकराविरुद्ध अत्याचाराची तक्रारी नोंदविली. याप्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.