महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्याला हेराफ़ेरीच्या आरोपाखाली अटक

March 08,2021

यवतमाळ : ८ मार्च - मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या सुर्ला (ता. झरी) समाजातील मंडळ अधिकार्याला हेराफेरी केल्याप्रकरणी मारेगांव पोलिसांनी अटक केली. यामुळे महसूल कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

तलाठी व मंडळ अधिकार्याने संगनमताने १५0 हेक्टर शेतजमिनीच्या मालकी हक्कात फेरबदल करून अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच शासनाने शेतकर्यांना मदतीपोटी पाठवलेल्या 0३ लाख ४१ हजार ३६0 रुपये रकमेचे चुकीचे वाटप केल्याचे उघड झाल्यामुळे याप्रकरणी तलाठी विजय निखार याला यापुर्वीच तर त्याला मदत करणारा मंडळ अधिकारी दीपक मनवर याला पोलिसांनी अटक केली. झरी तालुक्यातील सुर्ला साजात विजय गजानन निखार हे तलाठी म्हणून कार्यरत असताना या साजा अंतर्गत देणार्या गावातील १४८, ३६ हेक्टर शेतजमिनीच्या सातबारामध्ये खोडतोड करून अनेक शेतकर्यांची शेतीक्षेत्र कमी करून दुसर्याचे क्षेत्र वाढवून देण्याचा प्रकार घडला होता. अनेक खोट्या सातबारावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. आदिवासींची शेती गैरआदिवासींना खरेदीकरिता येत नसताना अनेक आदिवासींचे शेत गैरआदिवासींच्या नावे केल्याचाही प्रकार उघडकीस आला होता.