ट्रकचालकाला मारहाण करून साडेबारा लाखाचा माल पळवणाऱ्या आरोपींना अटक

March 08,2021

गोंदिया : ८ मार्च - ट्रकचालकाला अडवून त्याला मारहाण करून साडेबारा लाखाच्या लाखंडी सळ्या पळविणार्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील 14 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केेला आहे.फिर्यादी नामे प्रविण रामभाऊ धांडे रा. जैननगर मानकापूर, नागपुर हा ट्रक क्रमांक सीजी 07 सीए 3400 मध्ये लिंगराज कंपनी रायपुर छत्तीसगड येथून 12 लाख 45 हजार 633 रुपये किमतीच्या 25 टन 40 किलोग्राम लोखंडी स रु . किमतीचा माल भरुन नागपूर येथे जात असतांना देवरी शिवारात एक पांढर्या रंगाची विना क्रमांकाच्या चारचाकी वाहनामधून आठ लोक उतरले व ट्रकला अडविले. दरम्यान ट्रकचालक प्रविण यालाा मारहाण करून नायलॉन दोरीने त्याचे हातपाय बांधले व त्याला ट्रकखाली उतरविले आणि ट्रक घेऊन पसार झाले. 

याप्रकरणी प्रविण याने नागभीड पोलिस स्टेशन तक्रार केली. घटना देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू करण्यात आला. देवरी पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या तपास पथकाला पप्पू हसन रा. डोंगरगांव, हिंगणा जिल्हा नागपुर व त्याचे साथीदार अशा प्रकारचे गुन्हे करतात अशी माहीती मिळाली. माहितीच्या आधारे पप्पू हसन याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली. प्रथम त्याने ‘तो मी नव्हेच’ चा पाढा वाचला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच हसन याने त्याच्या 7 सहकार्यांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी शफोर नजिर हसन उर्फ पप्पु हसन (55), महेंद्र नेवालाल गमधरे (35), दोन्ही रा. डोंगरगांव, शुभम वासुदेव चक्रवर्ती (31), ऋषभ ज्ञानेश्वर चिरुटकर (19), अरुण देवाजी वरखडे (22), अभिलेख नामदेव गावतुरे (19), अशोक लक्ष्मण दुधनाग (19) सर्व रा. नविन गुमगाव/वाघधरा ता. हिंगणा, जि. नागपुर या सर्वांना ताब्यात घेत देवरी पोलिस स्टेशन येथे आणले. सर्व आरोपीतांना न्यायालयात हजर करुन त्यांची 8 मार्च पर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. गुन्ह्यातील ट्रक क्रमांक सीजी 07 सीए. 3400 मधील लोखंडी सळ्या व गुन्ह्यातील वाहन असा एकूण 14 लाख 35 हजार 663 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि अजीत कदम करीत आहेत.