दारू ठेवण्यासाठी जागा दिली नाही म्हणून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ५ वर्षाचा कारावास

March 05,2021

नागपूर : ५ मार्च - दारू ठेवण्यासाठी जागा  दिली नाही म्हणून महिलेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस   ४ मार्च रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोलीने ५ वर्षाचा कारावास व ७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. राकेश विश्‍वनाथ बोगा रा. मोहटोला ता. आरमोरी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हकीगत याप्रमाणे आहे की, १४ फेब्रुवारी २0१८ रोजी आरोपी राकेश हा पीडित महिलेच्या घरी जाऊन पोलिस माझा पाठलाग करीत आहेत. त्यामुळे माझ्याकडे असलेली दारू ठेवण्यासाठी जागा दे असे म्हणाले. मात्र सदर महिलेने आरोपीस दारू ठेवण्यासाठी जागा देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपी सदर महिलेसोबत भांडण करून केला. त्यानंतर अध्र्या तासानंतर तो झोपेत असलेल्या महिलेच्या डोक्यावर जोराने वार केला. तेव्हा ती जोराने ओरडल्याने तिचा मुलगा जागा झाल्याने आरोपीने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. याबाबत आरोपी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पूर्ण करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदारांचे बयाण नोंदवून, सरकारी वकीलांचा युक्तवाद ग्राह्य धरून विविध कलमान्वये आरोपीस ५ वर्षाचा कारावास व ७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.