पतीनेच केला पत्नीचा कुऱ्हाडीने खून

March 05,2021

नागपूर : ५ मार्च - मौदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुंभारपूर शेतशिवारात पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अभय दिवाकर येसकर असे आरोपीचे नाव आहे. अजय वडे नावाचा सालगडी शेतात आला असता शेतामधून एका महिलेचा जोरात ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे अजय वडे व त्याचा मित्र गजानन त्यादिशेने धावत गेले असता बाजूच्या शेतामध्ये आरोपी अभय येसकर त्यांना म्हणाला कि साल्यांनो इकडे येऊ नका नाहीतर तुम्हाला पाहून घेईल  त्यावेळेस आरोपीच्या हातात कुऱ्हाड होती त्याने त्याची पत्नी कांचन येसकर हिच्या डोक्यात  कुर्हाड घातल्याने ती जोरात मेलो असे म्हणून शांत झाली त्यानंतर आरोपी फरार झाला अजय वडे याने घटनास्थळावर पोहोचल्यानंतर बघितले तेव्हा कांचांचा मृतदेह आढळून आला याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला .